इंदिरानगर येथे दहावी बारावी गुणवंतांचा सन्मान, करिअर मार्गदर्शन
इंदिरानगर - येथील स्वा. वीर विनायक दामोदर सावरकर अभ्यासिका याचे वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत विशेष गुण संपादन केलेल्या विद्यार्थीचा गुणगौरव व मुक्तविद्यापीठाचे माजी उपकुलसचिव प्रफुल्ल चिकेरुर याचे विकसित भारतआणि शिक्षणाची दिशा या विषयावर करिअर मार्गदर्शन रविवार दि.१६ जून सकाळी १० वा. स्वर्णीमा सभागृह,संत ज्ञानेश्वर संकुल,बापुबंगला समोर, इंदिरानगर येथे आयोजित करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण गुणपत्रिकेची प्रत संपूर्ण नाव,पत्ता,मोबाईल क्रमांक सह माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे याचे संपर्क कार्यालय,सावरकर चौक, रथचक्र हों.सो.इंदिरानगर येथे दि १४ जुन २०२४ पर्यंत जमा करावे किवा व्हाट्सअप क्रमांक +919604111999 येथे संपर्क साधून जमा करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment