नाशिक जिल्हा रुग्णालयात एसीबीची कारवाई पाच हजारांची लाच स्वीकारताना कर्मचारी पकडला
नाशिक :- तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिष छगन भोईर वय ४५ वर्षे, व्यवसाय नोकरी, पद कनिष्ठ लिपीक, वर्ग ३, जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक रा. मानसी व्हिला बी, रो हाउस नंबर ३, बनारसी नगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक याला ५५०० लालेची मागणी केली असल्याने ०७/०६/२०२४ रोजी केली स्विकारली त्यापैकी ५,००० लाच स्विकारली
यातील हाकीगत अशी की तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीचे सिझरींग झालेले औषधोपचाराचे हॉस्पीटल खर्च ९२,३७९/- रुपयाचे वैदयकिय बिल मिळणेकामी वैदयकिय फाईल सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केले असता,आरोपी लोकसेवक यांनी वैदयकिय बिलाची फाईल पुढील कारवाई करुन लवकर आणुन देणेकरीता तक्रारदार यांचेकडे एकुण बिलाचे ६ टक्के प्रमाणे ५,६००/- रुपयाची लाचेची मागणी करुन, तडजोडअंती पंचा समक्ष ५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन, सदर ५,०००/- रुपये लाचेची रक्कम दिनांक ०७/०६/२०२४ रोजी १८:०० वा. चे सुमारास पंच साक्षीदारा समक्ष सामान्य रुग्णालय, नाशिक येथील प्रशासकिय कार्यालयातील त्यांचे कक्षेत स्विकारतांना रंगेहाथ पकडले असून यातील आलोसे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसेवक यांचे सक्षम अधिकारी-मा. जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, नाशिक
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा अधिकारी स्वप्नील राजपूत, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक सापळा पथक
पोहवा/ प्रभाकर गवळी पोहवा/ संतोष गांगुर्डे
पो.ना. सुरेश चव्हाण यांनी सदरची कारवाई केली.
Comments
Post a Comment