हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची ४८४ वी जयंती हिंदू एकता व कातारी शिकलकर समाज तर्फे साजरी
नाशिक :- मेवाड रत्न, हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची ४८४ वी जयंती हिंदू एकता आंदोलन पक्ष व अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाच्या वतीने शहिद भगतसिंह चौक, द्वारका सर्कल येथे जेष्ठ शुद्ध तृतीया या हिंदू तिथीनुसार सालाबादप्रमाणे जयंती कार्यक्रमात जयंती उत्सव २०२४ अध्यक्ष डॉ. हेमंत मगर यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे व अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. यावेळी संपूर्ण द्वारका परिसर महाराणाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. या आनंद समयी उपस्थित सर्वांना पेढे भरवत फ्टाक्यांच्या आतिषबाजीत जयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्यांनतर उपस्थित मान्यवरांचे मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी जयंती उत्सव माजी अध्यक्ष विरेंद्र टिळे, सुनील परदेशी, जगतसिंह जाधव, नानासाहेब पाटील, सुरेंद्र पाटील, जयप्रकाश गिरासे, जितेंद्र सिसोदिया, मिलिंद राजपूत, जयदीप पवार, जयदीप राजपूत, स्वप्नील घिया, सोमनाथ भोंड, नंदू पवार, पत्रकार करणसिंग बावरी, शाम पवार, प्रसाद बावरी, किरणसिंग पवार, प्रतापसिंग पवार, मंगला पवार, विजय पवार, अनिल भोंड, अतुल रणसिंगे, महादू बेंडकुळे, शाम भोंड, राजेंद्र समशेर, किरण जाधव, अभिजित बावरी, प्रेम पवार, रोशन जाधव, देवा पवार, जीवा पवार, भारत सदभैया, त्रीदेव सदभैया, यांच्यासह समाज बांधव तसेच महाराणा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment