छत्रपती शाहू महाराज जयंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने पेढे वाटून साजरी

नाशिक :- छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्याबरोबरच छत्रपती शाहू महाराजांचे अतुलनीय आणि मौल्यवान कार्य-विचार स्मरून छत्रपती शाहू महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले.
राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे देशहितकारक, सत्यशोधक विचार कार्य तळागाळात पोहोचावे, आपल्या वर्तमान आणि भविष्यातील पिढीला ते प्रेरक, मार्गदर्शक ठरावे, त्यातूनच सुजलाम, सुफलाम, संघटीत, लोककल्याणकारी देश घडावा हा प्रामाणिक हेतू आहे.उदोजी मराठा बोर्डिंग (मवीप्र)गंगापूर रोड येथील पूर्णकृती पुतळ्या समोर हा देखणा सोहळा पार पडला 
आजच्या कार्यक्रमावेळी जयंती निमित्त पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला नाशिकच्या कुस्तीला वैभव प्राप्त करून देणाऱ्या जुन्या पैलवानांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने दांडेकर दीक्षित तालीम संघांचे पै.हिरामण नाना वाघ पै.लक्ष्मण भास्कर पै.दीपक देवकर छपरीच्या तालमितील पै.शरद प्रभाने मोहन मास्तर तालीम संघांचे पै.दत्तू पाटील यांचा सन्मान करण्यात आला व त्याचबरोबर श्रीराम मर्दानी खेळाचा आखाडाचे सर्वेसर्वा आनंद ठाकूर यांनी एक रुपया देखील न घेता मर्दानी खेळाचे प्रत्यक्षिके सादर केली त्यांचा देखील सन्मान ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. 

या कार्यक्रमावेळी संभाजी ब्रिगेडचे विक्रम गायधणी व वैभव गायधणी यांनी देखील लाठ्या काठ्या बानाट्या फिरवून उपस्थितांना टाळ्या वाजवण्यास भाग पाडले.सर्वांनी त्यांचे कौतुक केले कार्यक्रमांचे प्रास्ताविक,आभार महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख शरद लभडे,नितीन रोठे पाटील,सहकारी मित्र नाना निकम,अनिल आहेर,  विकी गायधनी,मंदार धिवरे,हर्षल पवार,नितीन काळे,वैभव गायधनी,प्रेम भालेराव,सौरभ पवार,गणेश पाटील व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन