ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथे शालेय प्रवेशोत्सव उत्साहात साजरा


आंबेगण :- दि. १५ जुन २०२४ शनिवारी ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण ता दिंडोरी जि नाशिक येथे शालेय प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
नवीन शालेय वर्षी विद्यार्थी व पालक यांचं शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी मोठ्या आनंदाने स्वागत केले.
यावेळी प्रकल्प कार्यालय नाशिक येथील प्रकल्प अधिकारी मा. जाधव साहेब यांनी शाळेस भेट दिली असता अत्यंत उत्साहात प्रवेशोत्सव साजरा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले.
या प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी नाशिक प्रकल्प कार्यालय येथील उपलेखापाल श्रीम रुपाली पवार, विस्तार अधिकारी श्री भांगरे साहेब, शालेय व्यवस्थापन समिती (माध्यमिक)अध्यक्ष श्री राजेंद्र गायकवाड,(प्राथमिक) सौ.जयश्री वाघ व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भानुदास गोसावी यांनी केले,तर प्रास्ताविक प्राथमिक मुख्याध्यापिका सौ छाया पाटील व माध्यमिक मुख्याध्यापक श्री संदीप कुमावत यांनी केले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश व शालेय उपयोगी साहित्य यांचं वितरण करण्यात आले. मान्यवरांच्या शुभहस्ते शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या नंतर विद्यार्थी व पालक यांच्या साठी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली.


या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक यांच्या मध्ये शाळेविषयी गोडी निर्माण झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक मुख्याध्यापिका सौ छाया पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक श्री संदीप कुमावत, अधिक्षक जोरीसर, सुधीर जगदाळे हेमंत भामरे अपर्णा गणाचार्य, भानुदास गोसावी भाऊसाहेब पगार कैलास कुवर तुसेसर, तुषार ह्याळीज, प्रशांत थोरात हरिश्चंद्र मोरे, श्रीम निकुंभ, श्रीम पवार श्रीम ठाकरे, जगदीश केदारे, वसंत डोंगरे ,गणेश गवळी ,सतिष राऊत कमलेश सातपुते व इतर सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन