वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे यांच्याशी संवाद

नाशिक :- भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे यांच्याशी वाढदिवसाच्या निमित्ताने संवाद साधला असता गोविंद बोरसे यांनी आयुष्यातील महत्त्वाच घटना बाबत माहिती दिली. बोरसे हे वयाची ६५ वर्षे पूर्ण करून ६६ व्यां वर्षात पदार्पण करीत आहेत.६५ वर्षात त्यांनी नोकरी व्यवसाय,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून प्रवास केला आहे. नौकरी सेवानिवृत्ती नंतर बोरसे यांनी गोविंदाज एच आर सर्विसेस ची स्थापना केली व त्या माध्यमातून असंख्य तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे.गेल्या तीन महिन्यात ३९ शासकीय रोजगार मेळाव्याला हजेरी लावत बोरसे यांनी त्यामाध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. गोविंद बोरसे यांचा ६५ वर्षाचा जीवन प्रवास थक्क करणारा असाच आहे. प्राथमिक,महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करत त्यांनी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले.ते १९७९ साली मायको कंपनी म्हणजे आजची बॉश कंपनीत शिकाऊ कामगार ते व्यवस्थापक पदापर्यंतचा 41 वर्षाचा प्रवास केला.प्रथम शिकाऊ कामगार म्हणून काम करताना नंतर कामगार त्यानंतर मेकॅनिक असा एक एक टप्पा पार करून बाॅश कंपनीतच गटनिर्देशक त्यानंतर पर्यवेक्षक पदानंतर व्यवस्थापकीय पदावर ते आपल्या सातत्यपूर्ण  कामगिरी मुळे विराजमान झाले त्यांनी बॉस कंपनीत विविध व्यवस्थापकीय पदांच्या जबाबदाऱ्या कौशल्याने हाताळल्या बॉस कंपनीत उत्तमोत्तम काम केले. गोविंद बोरसे यांचा राजकीय प्रवास सन २०१० मध्ये भाजपात प्रवेश केल्यावर सुरू झाला.त्यांनी प्रथम मंडळ सचिव पदाची जबाबदारी पार पाडली.त्यानंतर विजय साने भारतीय जनता पार्टी नाशिक शहराचे अध्यक्ष असताना त्यांना भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली त्यानंतर आलेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या सहा महिने आधीच उत्तर महाराष्ट्राच्या समाज माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी तत्कालीन संघटन महामंत्री रवींद्र भुसारी यांनी बोरसे यांच्यावर सोपवली होती मिळालेली जबाबदारी प्रभावीपणे पार पडत बोरसे यांनी उत्तर महाराष्ट्राचा कानाकोपरात पोहचत पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. आणि आनंदाची बातमी म्हणजे २०२४ लोकसभेच्या एनडीएच्या आठही जागा एन डी ए ला मिळाल्या. त्यानंतर महागाई सपाट्याने सर्वांगीण दृष्ट्या प्रगती करत असलेल्या नाशिक महानगर ची पुन्हा 2015 साली नाशिक महानगर प्रसिद्धीप्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली.२०१८ साली पुन्हा नाशिक महानगर प्रसिद्धीप्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली त्यानंतर नाशिक महानगर भाजप प्रसिद्धीप्रमुख ची जबाबदारी प्रभावीपणे पार पडल्यानंतर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची माध्यमे विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली विशेष म्हणजे या कार्यकाळात आदरणीय विजय साने लक्ष्मण सावजी बाळासाहेब सानप गिरीश पालवे तसेच तत्कालीन सरचिटणीस व आत्ताचे नाशिक शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांचेही पक्षात काम करत असताना भरभरून सहकार्य मिळाले. या काळात विद्यमान आमदार सीमाताई हिरे, आमदार देवयानी फरांदे,आमदार राहुल ढिकले, तसेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांनी माध्यम विभागाच्या सोपवलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पाडल्या. उत्तर महाराष्ट्र माध्यम विभाग म्हणून जबाबदारी पार पाडत असतानाच महाराष्ट्राचे विद्यमान भाजपा अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या शिफारशीनुसार प्रदेश प्रवक्ते निवड केली.आजही त्याच जोशात गोविंद बोरसे हे  प्रभावीपणे पक्षासाठी काम करत आहे.त्यांना याकाळात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व भूतपूर्व माध्यम विभाग प्रमुख माधव भंडारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभते आहे.बोरसे प्रभावीपणे काम करत आहे.दरम्यानच्या काळात प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, व विश्वास पाठक, माध्यम विभाग प्रमुख  नवनाथ बन, भाजप प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे,प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी ,प्रदीप पेशकर, प्रवीण आलई, यांचेही सहकार्य मिळाले.बोरसे यांची प्रदेश निमंत्रित सदस्य म्हणूनही निवड करण्यात आली आहे. हे सर्व करत असताना आयुष्याच्या विविध वळणांवर आलेल्या संधीचे सोने बोरसे यांनी केले आज परिवारातील सदस्य आनंदाने जिवन जगत आहेत. त्यांना यासर्व जिवन प्रवासात सौ. सरला बोरसे यांनी साथ दिली आयुष्यात अपार कष्ट व मेहनत करून  संपूर्ण परिवाराला एका प्रगतीच्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवले आहे, गोविंद बोरसे यांच्या मातोश्री केशरबाई बोरसे यांचे वय 87 वर्ष आहे‌.त्यांचे शुभ आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या पाठीशी आहेत असे गोविंद बोरसे सांगतात.बंधू गणेश बोरसे व भगिनी विजया पाटील बोरसे दिवसातून एकदा का होईना त्यांना फोन करून विचारपूस करतात बोरसे याचा मुलगा प्रशांत बोरसे मार्केटिंग मॅनेजर. म्हणून पुणे येथील नामवंत कंपनीत कार्यरत आहे.तसेच स्नुषा मंजिरी बोरसे या पुणे येथील एका नामवंत विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मोठी मुलगी वैशाली गागरे बोरसे एफ आय एस ग्लोबल कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे.जावई संतोष गागरे एका नामवंत कंपनी मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. लहान कन्या तृप्ती व जावई अमेरिकेत नोकरी निमित्त सध्या स्थायिक झालेले आहेत. दोन मुली एक मुलगा तीन नातू व तीन नाता असा बोरसे यांचा परिवार आहे.वडील पूंजा वेडु बोरसे व मोठे बंधू श्रावण बोरसे, आमच्यात नाहीत त्यांच्या आठवणी मनाला चटका देऊन जातात.असे गोविंद बोरसे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना प्रसिद्धी प्रमुख न्यूज ला बोलताना सांगितले.


मा.श्री गोविंद बोरसे 
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता 
महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य 
उत्तर महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुख 
यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा...

संपादक समाधान शिरसाठ 

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला