नमो विचार मंच महाराष्ट्राच्या कार्यकारी अध्यक्ष पदी चंदन पवार यांची निवड

नाशिक :- भाजपाचे चंदन पवार यांची नमो विचार मंच महाराष्ट्राच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, नमो विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद प्रजापती आणि राष्ट्रीय मुख्य सचिव नरेंद्र पांचाळ यांनी दिल्लीतील मुख्य कार्यालयात याची घोषणा केली.आणि नियुक्तीपत्र देवून सार्थ निवड करण्यात आली आहे. सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असलेल्या पवार यांना त्यांची कार्यशैली बघूनच जबाबदारी देण्यात आली अशी माहिती मंचचे राष्ट्रीय मुख्य सचिव पांचाल यांनी दिली आहे.

पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नमो विचार मंचच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ज्या सरकारी योजना आहेत, त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी नमो मंचच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असणार आहे, जनतेला सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळावी आणि त्या योजनांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर व्हावी आणि त्या योजनांचा फायदा खरोखर गरीब, शोषित, वंचित आणि मध्यमवर्गीय लोकांना व्हावा याची जबाबदारी नमो विचार मंच घेणार आहे. सामाजिक संघटन असलेल्या नमो विचार मंचचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतात असणार आहे, सर्व राज्यांमध्ये जिल्हा आणि तालुकास्तरीय समित्या बनवण्याची तयारी नमो विचार मंचने केलेली आहे.लवकरच जिल्हा व तालुका पातळीवर समित्या घोषित करून जबाबदारी देण्यात येणार आहे, मी महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन करतो की ज्यांना समाजसेवेत रस आहे अशांनी माझ्याशी संपर्क साधावा त्यांना त्यांच्या कार्यशैली प्रमाने जबाबदारी देण्यात येईल.

पवार यांनी त्यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद प्रजापती, आणि नरेंद्र पांचाळ, यांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला