इंदिरानगर येथे योग शिबीराचा समारोप
स्टेट बँक कॉलनी सामाजिक सभागृह येथे माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने नृत्य योगाचे उद्घाटन झाले.योग योगाचर्या प्रशिक्षक दिलीप येलमामे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी शास्त्रीय नृत्य प्रशिक्षक सोनाली करंदीकर यांनी भरतनाट्यम गुरु याच्या विशेष सहभागाने योगाचे महत्त्व विशद करून नृत्य योगाचे तीन प्रकार सादर केले. या वेळी योग प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याचे प्रमुख पाहुणेच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आभार सागर येलमामे यांनी मानले.
Comments
Post a Comment