Posts

Showing posts from January, 2025

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची शिवसेना संपर्कप्रमुख गणेश कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Image
ना.रोड :- शिवसेनेचे संपर्क प्रमुख गणेश कदम यांच्या जयभवानीरोड कदम मळा निवासस्थानी गृहराज्यमंत्री  नामदार योगेश कदम, यांची सदिच्छा भेट.  याप्रसंगी समस्त कदम परिवाराच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजी करत स्वागत करण्यात आले.गणेश कदम यांच्या परिवारातील महिलांनी गृहराज्यमंत्री यांचे औक्षन केले, मंत्री योगेश कदम यांना क्रेनच्या साह्याने भव्यदिव्य पुष्पहार घालण्यात आला तसेच कदम परिवाराच्या वतीने शाल श्रीफळ आणि प्रभू रामचंद्रांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिक लोकसभा मा.खासदार हेमंत गोडसे, शिवसेना, छत्रपती युवा सेना,छत्रपती फाउंडेशन,श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर देवस्थान पदाधिकारी गणेश कदम समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  गृहराज्यमंत्री योगेश कदम, म्हणाले की गणेश कदम शिवसेना पक्षासाठी वाहून घेणारे नाशिकचे नेतृत्व असून आमचे वडील शिवसेना नेते रामदास भाई कदम यांचे अत्यंत विश्वासू आहेत मी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच नाशिक शहरात आलो त्यामुळे मी गणेश कदम यांच्या घरी सदिच्छा भेटीसाठी आलो आहे. गणेश कदम, यांचे एक शिवसैनिक ...

नाशिक महानगरपालिकेतील गुणनियंत्रण विभागाची माहिती घेण्यासाठी आयुक्त मनीषा खत्री यांची अचानक भेट

Image
नाशिक :- २८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी उशिरा नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी गुणनियंत्रण विभागाची पाहणी केली. या भेटी दरम्यान त्यांनी नाशिक शहरातील विविध विकासकामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासोबतच, गुणनियंत्रण विभाग कशा पद्धतीने कामकाज करते याची सविस्तर माहिती घेतली.तसेच प्राप्त नमुन्याची त्यांचा उपस्तितीत तपासणी केली. विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी आयुक्त खत्री यांना सांगितले की, गुणनियंत्रण विभाग नाशिक शहरातील विविध सुरू असलेल्या स्थापत्य विकासकामांवर कडक लक्ष ठेवतो. विभागाच्या कामकाजाची मुख्य उद्दिष्टे म्हणजे विविध विकासकामांमध्ये जी बांधकाम साहित्य वापरण्यात येतात त्यांची क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या नमुन्यांची तपासणी करणे ती मानकांनुसार असल्याची खात्री करणे, तसेच शहरात सुरु असलेली स्थापत्य कामे गुणवत्ता पूर्वक करण्याची जबाबदारी ही क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी यांची असून ती अचानक भेट देवून तपासली जातात त्यात काही त्रुटी निदर्शनास आल्यास संबंधित कार्यकारी विभागला कळविल्या जातात त्या कार्यकारी विभागामार्फत त...

कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना योजनांचा लाभ द्यावा – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

Image
साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्यासाठीच्या समितीची पहिली बैठक संपन्न मुंबई दि. 30 : कृषी विभागाने त्यांच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करावे. तसेच पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा, अशा सूचना वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिल्या. साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्याकरिता उपाययोजना सूचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची मंत्रालयात राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये आज कृषी विभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी राज्यमंत्री  जयस्वाल यांनी या सूचना दिल्या. बैठकीस महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, प्रधान सचिव (व्यय) साैरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. लाभार्थ्यांची निवड याद...