पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पोलीस अधीक्षक महिला अंमलदारांना सन्मान पुर्वक प्रदान

पुणे :- दि.१९/०९/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा सन २०२५ समारंभ कार्यक्रम राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक -२ राम टेकडी पुणे येथे पार पडला यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्तव्य मेळाव्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस घटकांना बक्षीस वितरण करण्यात आले.सन 2017 पासून महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा अंतर्गत सीसी टीएन एस (CCTNS) प्रणालीमध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस घटकांना बक्षीस प्रदान करण्यात येते. सीसीटीएनएस कार्यप्रणालीचा जास्तीत जास्त वापर गुन्हे प्रगटीकरण, गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी करण्यात यावा.याकरिता CES ranking त्याआधारे पोलीस घटकांकडून मासिक कामगिरीचा आढावा घेण्यात येतो त्यानुसार नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत राज्यात सीसी टी एन एस प्रणालीमध्ये नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन २०२५ या वर्षाचे द्वितीय क्रमांक पारोतोषीक जाहीर झाले राज्यात सीसीटीएनएस कार्यप्रणाली अंतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये प्रथम विजेता सांगली पोलीस घटक असून किती क्रमांक मुंबई पोलीस घटकाची निवड करण्यात आली होती. त्यानुसार दिनांक १९/०९/२०२५ रोजी रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा सन २०२५ च्या बक्षीस वितरणा समारंभामध्ये महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,तसेच सीसीटीएनएस प्रणालीचे महिला अंमलदार सीमा उगलमुगले, ज्योती अहिरे, निकिता खुळगे, यांना द्वितीय क्रमांक विजेता सन्मानचिन्ह बक्षीसपत्र प्रदान करून गौरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस घटकातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नाशिक ग्रामीण पोलीस दलाने मागील वर्षीही द्वितीय क्रमांकाचे बक्षीस यश संपादन प्राप्त केले होते. यापूर्वीही आपल्या कार्य कुशलतेचा ठसा उमटवला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आपण पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस (CCTNS)कार्यप्रणालीमध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय अटक होणाऱ्या आरोपी त्यांची कुंडली जुळवून गुन्हे प्रगटीकरण व गुन्हे प्रतिबंध करण्यात प्रभावी कामगिरी नाशिक ग्रामीण पोलिसांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन