परमपूज्य फरशीवाले बाबांना राष्ट्रीय गौरव सन्मान प्रदान
नाशिक जिल्ह्याचा राष्ट्रीय पातळीवर उंचावला सन्मान
द पर्यावरण, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील परमपूज्य महामंडलेश्वर सद्गुरु (रघुनाथ जाधव) देवबाप्पाजी माऊली फरशीवाले बाबा यांना "राम दयाळू सिंह"राष्ट्रीय गौरव सन्मान २०२५" प्रदान करण्यात आला.पर्यावरण योग व सामाजिक सुरक्षा संस्था, दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा सन्मान दिल्ली सरकारचे कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांच्या हस्ते इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास सेक्रेटरी, डायरेक्टर, न्यायमूर्ती तसेच केंद्र व राज्य शासनातील विविध उच्चपदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित होते.सन्मानप्रदान सोहळ्यात संस्थेचे चेअरमन व्ही.पी.सिंह,यांनी याप्रसंगी फरशीवाले बाबांच्या निस्वार्थ कार्याचा लेखाजोखा सादर करत, त्यांच्या पर्यावरण रक्षण, सामाजिक आणि अध्यात्मिक सेवेचे विशेष कौतुक केले.या गौरवप्रसंगी स्वामी सच्चिदानंद,विश्व स्वरुपानंद महाराज,आशुतोष देशपांडे,आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.परमपूज्य फरशीवाले बाबांना मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान नाशिक जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरली असून,त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्याचा सन्मान राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच विविध स्तरावर परमपूज्य फरशीवाले बाबांचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment