त्र्यंबकेश्वर नगरपरिषद पदाची सुत्रे राहुल पाटील यांनी स्वीकारले
त्र्यंबकेश्वर :- चोपडा नगर परिषदेतून त्र्यंबकला बदलून आलेले मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी त्रंबकेश्वर नगरपालिका मुख्याधिकारी पदाचा कारभार स्वीकारलेला आहे.प्रशासक या नात्याने ते कारभार पाहणार आहे.आगामी सिंहास्थ कुंभमेळा लक्षात घेता कोण मुख्याधिकारी त्रंबकेश्वरसाठी येणार याकडे जनतेचे त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाचे देखील लक्ष लागलेले होते.कार्यरत आणि दक्ष मुख्याधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्यात राहुल पाटील,यांची ओळख होती.त्रंबकेश्वर देवस्थानचे पदसिद्ध सचिव म्हणून देखील काम बघणार आहेत.भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता,सिहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी पाटील यांनी त्र्यंबकेश्वर नगरीत लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिका प्रशासकीय अधिकारी विजय जाधव यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी अभियंता स्वप्नील काकड, नगररचनेचे मयूर चौधरी ,तसेच अकाउंट विभागाचे मोहन नादरे व अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment