ऑन ड्युटी रेल्वे टिकीट चेअर (टिसी) यांची बॅग लंपास करणारा चोरटा ताब्यात दोन गुन्ह्यांची उकल
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
ना रोड :- दिनांक 25/08/2025 रोजी चे गाडी नं. 17058 देविगिरी एक्सप्रेस ऑन ड्युटी टी सी अशोक कुमार यादव, राहणार नाशिक हे मनमाड ते मुंबई अशी ड्युटीवर असताना त्याची कोच मध्ये ठेवलेली एक काळ्या रंगाची सँगबेंग त्यांची किंमत. 1000/-रु.त्यात 1) एक काळ्या रंगाचा रेल्वे TCचा कापडी कोट, 2) रेल्वेचा TCचा बॅच आणि नेमप्लेट, आधार कार्ड,रेल्वेचे ओळखपत्र,ड्युटीपास,तक्रार पुस्तिका,जुने वापरते कपडे. असा एकुण.5, 500/- रु.किं.चा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे गैरहजरीचा फायदा घेऊन यांची नमूद वर्णाची बॅग चोरी गेल्याची मुंबई येथे तक्रार दिल्याने सदरची तक्रार वर्ग होवून आली रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक 25/08/2025 रोजी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील, पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील,पोलीस हवालदार राज बच्छाव,आर पी एफ आरक्षक मनिष कुमार,सागर वर्मा,के के यादव यांना प्रवासी रेल्वे एक्स्प्रेस वर गस्त दरम्यान एक संशयित इसम तेजस अजित छाबडा, राहणार इगतपुरी,तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक हा दोन बॅग घेऊन रेल्वे स्टेशन नाशिक रोडवर संशयितरित्या फिरत असताना दिसून आल्याने त्या ताब्यात घेऊन चौकशी केल्याने फिर्यादी यांची बॅग त्याच्याकडे मिळून आली आहे. त्याने चोरी केल्याचे कबूल केल्याने त्यास गु.र.न. 167/2025 कलम 305(C) BNS मध्ये दोन पंचा समक्ष अटक करून सादरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच त्याच्याकडे इतर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता दिनांक 14/08/2025 रोजी रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथे अमरावती एक्सप्रेस मधून एक बॅग उचलून त्यात मिळून आलेले सोन्याचे दागिने काढून चोरी केल्याचे कबूल केले.करिता दाखल गुन्ह्याची पडताळणी केली असता दिनांक 14/08/2025 रोजी गु. र. न. 156/2025 कलम 305(C) BNS मध्ये सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले.त्या सदर गुन्ह्यात वर्ग करून अटक करून त्याचे कडून 1) 05 ग्रॅमची सोन्याची अंगठी2) 05 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्रातील पॅन्डेल 3) 6 ग्रॅमचे सोन्याचे मनी 4) 150 ग्रॅमचे पायल असे एकूण 95500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याचे कडून 2 गुन्हे उघड करण्यात आले. सदरची कामगिरी एस पी लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग मनमाड वसंत भोये,यांचे मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस ठाणे नाशिकरोड येथील प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन बनकर, ग्रे.पो.उपनिरीक्षक राजेश सोनवणे, सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील,पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील,राज बच्छाव, रेल्वे सुरक्षाबल नाशिकरोड येथील निरीक्षक नवीन प्रताप सिंह, आरक्षक मनिश कुमार, के.के.यादव, सागर वर्मा,यांनी केली आहे.
Comments
Post a Comment