मोबाईल चोरट्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या मुद्देमाल हस्तगत
ना.रोड :- रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड येथील दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीतास पकडण्यात यश त्याच्याकडून चार मोबाईल हस्तगत करण्यात आले.रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथील रेल्वेतील प्रवासी यांचे दिनांक. 25.06.25 रोजी गाडी हावडा मुंबई मध्ये एक्सप्रेस मधून प्रवासी नाव सैफुल रहिमान शेख,राहणार पश्चिम बंगाल यांचा एक काळ्या रंगाचा रियलमी कंपनीचा मोबाईल किंमत १७००० रुपयाचा चोरीस गेला होता.फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.चोरीस गेलेल्या मोबाईलचे मोबाईल ट्रेसिंग प्राप्त करून चोरीचा मोबाईल वापरणार विकास संजय मोरे,राहणार सिन्नर याच्याकडून जप्त करून मुख्य आरोपी भानुदास शेळके,मूळ राहणार शेळकेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर,सध्या राहणार सिन्नर यांचा गुप्त बातमीदारा मार्फत शोध चालू असताना,सदर पाहिजे आरोपी हा रेल्वे स्टेशन नाशिक रोड हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ त्याचा शोध घेऊन त्यास पकडण्यात आले.त्यास गुन्हात अटक करून त्याच्याकडून अजून ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले.दुसरा मोबाईल चोरीचा गुन्हाही उघड करण्यात आला आहे.आरोपीत याच्या कडून ५७१०० रुपयांचे चोरीचे मोबाईल जप्त केले.सदरची स्वाती भोर,उपअधिक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये,यांचे मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस ठाणे नाशिकरोड येथील प्रभारी अधिकारी स.पो.नि.सचिन बनकर, पोलीस उपनिरीक्षक सुभाष कुलकर्णी, सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील, पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील, बाळू आव्हाड,राज बच्छाव,उत्तम शिरसाठ, बेबीनंदा गायकवाड,व रेल्वे सुरक्षाबल नाशिक रोड येथील प्रभारी अधिकारी दिपक दुहेन,आरक्षक,सागर वर्मा,मनिश कुमार,के.के.यादव यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा