लाखांच्या मुद्देमालासह दोघे ताब्यात अवैध क्रेडिट कार्ड कर्ज वसुली कॉल सेंटरवर कारवाई

बातमी संदर्भातील नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची माहिती बघण्यासाठी क्लिक करावे नाशिक :- नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीत अवैधपणे चालवण्यात येणारे विविध कॉल सेंटर ची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे सूचना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, यांच्याकडून देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, यांना व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दि.१५/०९/२०२५ रोजी सायंकाळी मीनाताई संकुले इगतपुरी येथे अवैध्यरित्या चालवण्यात येणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. सदरच्या ठिकाणी क्रेडिट कार्ड वर दिले जाणारे कर्ज,ग्रहकर्ज संबंधित कर्ज वसुलीसाठी कर्ज घेणारे खातेदार त्यांचे नातेवाईक मित्र व शेजारी यांच्याशी संपर्क साधून बँकेची बनावट ओळख धारण करून बेकायदेशीर पुणे कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याची खात्री पटल्याने इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं १७७/२०२५ भा.न्या.स.३१८(४)३१९(२)६२,३(५) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारणी अवैध कॉल सेंटर चालवणारा नरेंद्र शशिकांत भोंडवे,वय ३२ राहणार महात्मा गांधी नगर महालक्ष्मी मंदिर जवळ इगतपुरी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक दुसरा इसम पारस संजय भिसे,वय २६ राहणार रमाबाई कॉलनी प्रियदर्शन चाळ कमिटी घाटकोपर मुंबई यांना इगतपुरी पोलिसांच्या वतीने अटक करण्यात आली असून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. या कारवाईत २४ लाख ३२ हजार किमतीचे कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या ठिकाणी ४० ते ५० कर्मचारी काम करत असल्याचे, तसेच खातेदारांचे अवैधपणे डिटेल वैयक्तिक डाटा संकलित करीत असल्याचे दिसून आले आहे सदरच्या कॉल सेंटरला स्थानिक नगरपंचायत प्रशासनाचा परवाना नसल्याचे निदर्शनास आले आहे ह्या काॅल सेंटरवर आर.बी.एल,एच.डी.बी फायनान्स प्रो फायनान्स यांचे कर्ज वसुलीचे काम करत असल्याचे दिसून आले आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास नागेश मोहिते, सायबर पोलीस ठाणे हे करित आहेत. सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी हरिष खेडकर यांच्या सुचनेप्रमाणे सारिका अहिरराव पोलीस निरीक्षक इगतपुरी पोलीस स्टेशन, रवींद्र मगर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,नागेश मोहिते, सायबर क्राईम पोलीस निरीक्षक, पथकातील गणेश परदेशी,निलेश देवराज, विनोद गोसावी, अभिजित पोटींदे, राहूल साळवे, नेमणूक इगतपुरी पोलीस स्टेशन, तसेच पो.ऊ.नि.पाराजी वाघमोडे,पो.ऊ.नि.दिंगबर थोरात, परीक्षीत निकम,तुषार खालकर, सुनील धोकरट, सायबर पोलीस ठाणे आदींनी केली.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन