मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दहेगाव येथील ५ एमव्हीए क्षमतेच्या नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राचे भुमीपूजन


शेतकरी व ग्राहकांना अखंड व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार मंत्री छगन भुजबळ


नाशिक दि.12 :-शेतकरी बांधवांना शेती सिंचनासाठी आवश्यक असलेल्या वीजेची गरज ओळखून शासनाकडून महावितरणच्या माध्यमातून नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्यात येत आहेत. या विद्युत उपकेंद्रांच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांनाअखंड  व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.निफाड तालुक्यातील वाहेगांव भरवस येथे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेतून रुपये ३७१.४१ लक्ष निधीतून  ५ एमव्हीए क्षमतेच्या नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राचे भुमीपूजन  मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रांतअधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडी, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, महावितरणचे कार्यकारी अभियंता वाय.पी.निकम, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर,लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप,संचालक डॉ.श्रीकांत आवारे,पांडुरंग राऊत, सरपंच सचिन दरेकर,सरपंच भगवान तिपायले,बालेश जाधव,अशोक नागरे,माधव जगताप,सीमा दरेकर,सोहेल मोमिन यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री भुजबळ म्हणाले की.फीडर सेगरेगेशन" प्रकल्पांतर्गत कृषी व घरगुती वीज पुरवठा विभक्त केला गेला आहे. महावितरणच्या या विविध विकास कामांमधून येवला,लासलगाव व निफाड तालुक्यातील ग्राहकांना २४ तास मुबलक वीज सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. आर.डी.एस.एस अर्थात सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून तालुक्यातील विद्युत केंद्रांचे बळकटीकरण  करणे, टीडीओ मीटर बसविणे, गावठाण फीडर विलगीकरण, उच्च व लघुदाब विद्युत वाहिन्यांचे बळकटीकरण व वीज हानी कपात करणे, नवीन उपकेंद्र निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, अतिरिक्त रोहित्र बसविणे इत्यादी कामे सुरू करण्यात आली  आहेत. यासोबतच देवगाव, विंचूर, कानळद विद्युत केंद्राच्या क्षमतेत वाढ करण्यात येऊन त्याची क्षमता १० एमव्हीए करण्यात आली आहे. खडक माळेगाव विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए व मरळगोई विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र कार्यान्वित करण्यात आले असल्याचे मंत्री भुजबळ,यांनी सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त, हरित आणि अखंड वीज पुरवण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला. आरडीएसएस लॉस रीडक्शन  योजनेअंतर्गत एसी केबल टाकण्यात येऊन कंडक्टर बदलणे, अपग्रेड करणे ही कामे करण्यात येत असून त्यानंतर रोहीत्रांवरील अनधिकृत भार कमी होऊन रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.आशियाई विकास बँक प्रकल्पाद्वारे रूपये ५६० कोटी निधीतून नाशिक-निफाड-येवला प्रमुख राज्यमार्ग क्र.२ पिंपळस ते येवला चौपदरी कॉंक्रीट रस्ता किमी १७९/०० ते २३५/०० सुरू आहे. तसेच रुपये ७६ कोटी ८० लक्ष निधीतून प्ररामा २ भरवस फाटा ते कोपरगाव तालुका हद्द रामा ७ कॉंक्रीट रस्ता ९/६०० कि.मी. चे कामही प्रगतीपथावर आहे. निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे नवीन विद्युत उपकेंद्र निर्माण करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना मंत्री भुजबळ,यांनी दिल्या. येवला,निफाड व लासलगाव तालुक्यात महावितरण तर्फे सुरू असलेल्या विविध कामांची माहिती कार्यकारी अभियंता निकम,यांनी प्रास्ताविकात दिली.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन