कुंभार समाज विद्यार्थी गुणगौरव समाज भूषण पुरस्कार समारंभ मेळावा संपन्न
नासिक :- दि.५. कुंभार स.सामा.सं.महाराष्ट्र प्रदेश संलग्न नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीच्या वतीने (सालाबाद प्रमाणे) विद्यार्थी गुणगौरव ,समाज भूषण संतसेवा, आदर्श माता - पिता, पुरस्कार समारंभ शुक्रवार दि.५/९/२०२५, श्री लक्ष्मी बॅकवेट हॉल. पंचवटी. नाशिक. येथे, ,मोठ्या उत्साही आनंदी,वातावरणात संपन्न झाला.यावेळी प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश दादा दरेकर, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,आ. देवयानीताई फरांदे,आ. सरोजताई अहिरे,तसेच,नाशिक जि.वि.समितीचे संस्थापक अध्यक्ष, कुंभार.स.सा.सं.म.प्र.चे, प्रदेश अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर,नाशिक जिल्हा अध्यक्ष सोमनाथ सोनवणे अभोना,सोमनाथ सोनवणे दिंडोरी,अशोक सोनवणे, संजय रुईकर,डॉ दिलीप मेणकर,शरद आहेर, संजय जोरले, अरुण नेवासकर,शहराध्यक्ष गणेश आहेर,ज्ञानेश्वर जठार,समाधान सोमासे, विजय रसाळ,तसेच नाशिक जिल्हा तसेच राज्याच्या विविध भागातून आलेले विशेष निमंत्रित समाजबांधव मान्यवर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे,विशेष निमंत्रित, मान्यवरांचा पुष्पगुच्छ,शाल देऊन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच कुंभार समाजातील उल्लेखनीय भूषणावह कार्य केलेल्या अशा पुरस्कारार्थी मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी,शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये समाज भूषण पुरस्कारार्थी रमेश दामोदर जोर्वेकर, प्रकाश नारायण साळवी, डॉ श्रीराम लक्ष्मण कोल्हे ,भाईदास कौतिक कुंभार, संगीता पंढरीनाथ जाधव, सुशीलाबाई गणपत बोरसे, काशिनाथ कृष्णा चव्हाण, निर्मलाताई काशिनाथ चव्हाण, यांना आदर्श माता-पिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच ह.भ.प.रोहिदास महाराज जगदाळे, ह.भ.प.दत्ता ज्ञानेश्वर चव्हाण,यांना,संत सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शासकीय, विविध विभागातून सेवानिवृत्त समाज बांधव,पदवीधर,तसेच विशेष प्राविण्य,दहावी /बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश दरेकर,प्रदेश अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, शरद आहेर,संजय जोर्ले,संजय रुईकर, डॉ. दिलीप मेनकर, इंजि. बबनराव जगदाळे, सुभाष कुंभार,अरुण नेवासकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.ना.नरहरी झिरवाळ,आ. देवयानी फरांदे, आ.सरोज अहिरे,यांनी उपस्थितीत समाज बांधवांचे मनोगत जाणून घेत आम्ही कुंभार समाजाच्या कायम पाठीशी आहोत आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या शासनदरबारी सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहु असे आश्वासन यावेळी दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष सोमनाथ सोनवणे,यांनी केले,स्वागत शहराध्यक्ष- गणेश आहेर यांनी केले,सूत्रसंचालन पुंडलिकराव सोनवणे व सविता जगदाळे, यांनी केले.अनिल आहेर यांनी आभार मानले.वरील कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा तसेच राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने समाज बांधव माता भगिनी उपस्थित होत्या.वरील कार्यक्रमात अनेक पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमांसाठी ज्या दानशूर समाज बांधवांनी देणगी दिली त्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रम सुटसुटीत व्यवस्थितरीत्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी,गेली दोन-तीन महिन्यांपासून अनेक वेळा नियोजन बैठका घेण्यात आल्या होत्या. नाशिक जिल्हा विकास समितीचे,संस्थापक अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, जिल्हा अध्यक्ष- सोमनाथ सोनवणे,शहर अध्यक्ष -गणेश, आहेर,अनिल आहेर,पुंडलिक सोनवणे,रमेश गायकवाड, वसंतराव कुंभार, बाळासाहेब जोर्वेकर, के.के चव्हाण,अशोक जाधव,अरविंद क्षीरसागर,डॉ.जितेंद्र भालेराव, सुभाष कुंभार,राधेश्याम गायकवाड,डॉ संजय काशीद, विजय चव्हाण अभोणा,रमेश गायकवाड नाशिक,
गोकुळ सोनवणे,प्रवीण जाधव,आप्पासाहेब जोर्वेकर,रवींद्र चौधरी,राजेंद्र आहेर,मारुती रसाळ,भरत शिरसाट,रमेश राजापुरे, बापू गोरे,संजय भालेराव,देवेंद्र गाडेकर,जगदीश मोरे,महेश चव्हाण,आदींसह महिला आघाडीच्या कांचन बोरसे, शकुंतला जाधव,सुवर्णा जाधव, रंजना रसाळ, स्नेहलता गायकवाड,सविता जगदाळे ,डॉ.अर्चना भालेराव,सुनंदा सोनवणे,अर्चना जोंधळे, जयश्री गायकवाड,कल्पना गायकवाड,यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment