भाजपा कार्यालयात आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान कार्यशाळा संपन्न



भारताची वाटचाल संपुर्ण आत्मनिर्भर भारताकडे - आ.विक्रम पाचपुते

नाशिक : महात्मा गांधींनी स्वातंत्र्य प्राप्ती काळात स्वदेशीचा नारा दिला होता. त्यानंतर राजकीय इच्छा शक्तीच्या अभावामुळे भारत परावलंबी होता. त्यामुळे भारताचे परकीय चलन जास्त जात होते. एक काळ असा होता की भारताला सोने गहाण ठेवावे लागले होते. भारताकडे पहाण्याचा जगाचा द्ष्टीकोण त्यावेळी तुच्छ होता.परंतू २०१४ साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले व त्यांनी लोकल फॉर व्होकल व स्वदेशीचा नारा दिला. टाचणी,साबण,टुथ पेस्ट ते विमान निर्मिती अशा प्रत्येक क्षेत्रात भारताने स्वदेशी उत्पादने निर्माण केली. छोटया छोटया देशांनी पुर्वी अर्थव्यवस्था क्रमवारीत भारताला मागे टाकले होते.आज भारत जागतीक क्रमवारीत चवथ्या क्रमांकावर असून येत्या काही दिवसात भारत तिसऱ्या स्थानी येणार आहे.याचे कारण आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान आहे. दुरदृष्टी व स्वदेशी जनजागर यामुळे देशात स्वदेशी मोहिम यशस्वी झाली असून आता भारत जगाचे नेतृत्व करत असल्याचे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान कार्यशाळेचे प्रदेश संयोजक आ.विक्रम पाचपुते यांनी सांगितले.भाजपा नाशिक महानगर जिल्हा,दक्षिण ग्रामीण,उत्तर ग्रामीण अशा संघटनात्मक 3 जिल्हयांची कार्यशाळा भाजपा वसंतस्मृती कार्यालयात नाशिक येथे संपन्न झाली.याप्रसंगी आ.पाचपुते यांनी आत्मनिर्भर भारत कार्यशाळेचे महत्व विषद केले.याप्रसंगी त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने स्वदेशीचा जागर करा,व्होकल फॉर लोकल,स्वदेशीचे उत्पादन वाढ व स्वदेशी खरेदी व विक्री उपक्रम बूथ स्थरापर्यंत नेण्याचे आवाहन केले. केंद्राने काही घरगुती अत्यावश्यक वस्तुंवरचा जी एस टी कमी केला. काही वस्तुंवर जी एस टी १०० टक्के माफ केला आहे. त्यामुळे स्वदेशी वस्तुंचे बाजारात दर कमी होणार असून त्यांचाही फायदा ग्राहकांना होणार असल्याचे आ.पाचपुते यांनी सांगितले. येत्या २६ तारखेपासून या अभियानाची सुरुवात देशभर होणार असून केंद्रीय नेते,मंत्री,खासदार, आमदार,पदाधिकारी ते बूथ प्रमुख सर्वांनी या अभियानाचा प्रचार व प्रसार करावा असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार,दक्षिण ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुनिल बच्छाव,सरचिटणीस सुनिल देसाई, ॲड.श्याम बडोदे,सोनाली कुलकर्णी, शरद कासार,लता राऊत,रणजीत देशमुख या कार्यशाळेचे संयोजक, सहसंयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन