वडनेर भैरव :- पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजि.नं १०५/२०२५ भा.न्या.स.कलम३०९(४)३(५) अंतर्गत जबरी चोरीचा दाखल झालेला आहे.यागुन्ह्यातील फिर्यादी यश पवार,रा एकदंत नगर अंबड नाशिक हे त्यांच्या मोटरसायकलवर नाशिक कडून मालेगाव बाजूस जात असतांना मुंबई आग्रा महामार्गावर वडाळाभोई गावाच्या उड्डानपुल जवळ मोटारसायकल वरुनच मागच्या वाजून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी फिर्यादीच्या, पत्नीची हातातील पर्स हिसकावून २३ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल बळजबरीने चोरुन नेल्या बाबत वडनेर भैरव येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर,अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह सिंधू,यांनी जिल्ह्यातील उघड न झालेल्या गुन्हयाबाबत आढावा घेऊन गुन्हे उघड करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखा पथकास सुचना दिल्या. सूचनानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, यांच्या पथकाने वरील गुन्ह्याच्या समांतर तपासात मिळालेल्या तांत्रिक माहितीनुसार गुप्त बातमीदाराकडून माहिती घेत मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातून संशयित साजिद रशिद खान वय २० वर्षं रा खेरवा,जि.धार.मध्यप्रदेश याला पथकाने ताब्यात घेतले.त्याला पोलीसी खाक्य दाखवल्याने त्यांच्याकडून वरील गुन्ह्यातील दोन मोबाईल ओपो एफ १७ प्रो व रिअलमी १२ एक्स असा २३ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.त्याने गुन्ह्यातील दोन साथीदार संशयित आरोपीत २)रिझवान युसुफ खान रा खेरवा ता मनावर,३)अबु आझाद खान,रा खलदा ता मनावर जिल्हा धार, यांच्या मदतीने सदरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.यातील संशयित आरोपीत २) व ३) फरारी हे महागड्या मोटरसायकलवर भरधाव वेगाने येऊन वाटसरू,दुचाकी चालकांच्या पर्स मोबाईल,बॅग किमंती वस्तू जबरदस्तीने हिसकावून चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.चोरी केलेला मुद्देमाल आरोपीत साजीद रशीद खान, यांच्याकडे विक्रीसाठी देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.हि आरोपीतांची टोळी धार जिल्ह्यातील संपत्ती संबंधित अपराधी निवास नावानं ओळखले जाणारे! खेरवा नागीर गावातील आहेत! साजीद रशीद खान याला गुन्हे शाखाने अटकेत घेतले असून त्यांच्या दोन्ही साथिदारांचा पोलीस शोध घेत आहे.त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे पोलीस पथकाने सांगितले.मोबाईल चोरीतील,गुन्हेगाराला पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह सिंधू,यांच्या मार्गदर्शनाखाली सुचनाप्रमाणे गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर,पो,उ,नि,हर्षल भोळे, पोलीस अंमलदार सतिष जगताप, प्रवीण गांगुर्डे, धनंजय शिलावटे, ज्ञानेश्वर सानप, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम,नितीन गांगुर्डे,यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला आहे.
Comments
Post a Comment