नागरीकाभिमुख सेवा गरजुंपर्यंत पोहोचवा - तहसीलदार कैलास चावडे
बागलाण :- पंचायत समिति बागलाण येथे अनुलोम मित्रांची शासकीय अधिकारीं सोबत योजना परीचय कार्यशाळा संपन्न बागलाण भागांतर्गत "अनुलोम मित्र योजना प्रशिक्षण कार्यशाळा व शासकीय अधिकारी परीचय" हा विषेश कार्यक्रम पंचायत समिती सभागृह सटाणा येथे संपन्न झाला.शासनाच्या विविध योजनांची माहिती व नागरीकाभिमुख सेवा कशा पद्धतीने तळागळात पोहचवता येतील यावर कार्यक्रमात भर देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलाण चे तहसीलदार कैलास चावडे,हे यावेळी उपस्थित होते.चावडे यांनी शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेउन नागरीकाभिमुक सेवा व शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोच करण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार कैलास चावडे, यांनी केले. तसेच पंचायत समिती गावाचा केंद्र बिंदु असुन यामध्ये शासनाच्या अनेक योजनांचे वेग-वेगळे विभाग असुन या विभागांच्या योजना गरजु लाभार्थीन पर्यंत पोहोचवा,तसेच सर्व योजनांची यादी तयार करून गावा-गावात पोहोच केली जाईल, यासाठी अनुलोम मित्र यांनी गावा-गावात जनतेला मार्गदर्शन करावे,असे आवाहन सहायक गटविकास अधिकारी भैय्या सांवत,यांनी केले.
तसेच नरेंद्र महाले (तालुका कृषिविभाग) शिंदे (कृषी विभाग पं.स.) विनायक कोळी(पुरवठा विभाग) शुभम घुले,पाईकराव (पशुसंवर्धन विभाग),भावसार साहेब, (भुमिअभिलेख विभाग) यांनी आप-आपल्या विभाग स्तरावरील योजनांची माहिती दिली. यावेळी सर्व शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते, तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग विभाग, घरकुल, जि.प.अंतर्गत योजना, एस.सी.,एस.टी. घटक योजना, विहिर, ट्रॅक्टर, कृषीपंप, पशुविभाग वैयक्तिक लाभाच्या योजना, अंत्योदय योजना, पांझन रस्ते, गोपीनाथ मुंडे आपघात विमा योजना, कृषी अवजारे, आरोग्य, आदी, नागरी हिताच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनुलोम प्रमुख कु.विशाल ढोमणे यांनी केले.अरुण शिरोळे,यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व अनुलोम मित्रांनी प्रयत्न केले.
प्रतिनिधी
*श्री.अरुण दादा शिरोळे*
*मो.8007760500*
Comments
Post a Comment