होरायझन इंटरनॅशनल अकॅडमीमध्ये परिवहन समितीची बैठक वाहतूक पोलिसांचे मार्गदर्शन
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज
नाशिक :- मविप्रच्या अश्विननगर येथील होरायझन इंटरनॅशनल अकॅडमीमध्ये नुकतीच परिवहन समितीची बैठक उत्साहपूर्ण आणि उद्देशपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला शाळा प्रशासनासोबतच वाहतूक विभागातील मान्यवर अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. सदस्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित करत काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ मोटार वाहन निरीक्षक वैभव दुबेवार,अंबड पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे आणि वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन जाधव उपस्थित होते.मुख्याध्यापिका पूनम सिंह यांनी मान्यवरांचे स्वागत करत बैठकीचे औपचारिक उद्घाटन केले.बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुरक्षितता अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.यामध्ये शालेय वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट,वैध ड्रायव्हिंग लायसन्स, चालक व सहाय्यक यांचे गणवेश, प्राथमिक उपचार पेटी, तसेच प्रत्येक वाहनात अग्निशामक यंत्र असणे अनिवार्य असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
Comments
Post a Comment