मराठा हायस्कूल मध्ये ओझोन दिन उत्साहात संपन्न
नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये ओझोन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर
_________________________________________
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये ओझोन दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात होते.व्यासपीठावर उपमुख्याध्यापक संजय ठाकरे,पर्यवेक्षक देविदास भारती,विजय पवार व प्रताप काळे उपस्थित होते.प्रांजल जानराव व कार्तिकी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय मनोगतात थोरात सर म्हणाले आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.आपल्या वातावरणातील सर्वात महत्त्वाचा थर म्हणजे ओझोन थर.हा थर आपल्याला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवतो.आजचा हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणे,पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाचा वापर करणे,जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय सुचविणे हा आहे. ओझोन थर वाचवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे असे ते आपल्या मनोगतात म्हणाले.सूत्रसंचालन लावण्या महाले व वेदिका बोरसे यांनी केले.आभार अनुज जाधव व आराध्या दशपुते यांनी मानले.कार्यक्रमाचे सुंदर असे फलक लेखन विद्यालयातील कलाशिक्षक जगदीश डिंगे व केशव खताळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विज्ञान शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.
Comments
Post a Comment