रेकाॅर्डवरील आरोपीस जेरबंद करण्यास यश दोन गुन्हे उघडकीस
ना.रोड :- रेल्वे पोलीस ठाणे नाशिकरोड येथे दि. 16.09.2025 रोजी गस्तकामी रेल्वे स्टेशन नाशिकरोड येथील सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे, पाटील,पो.हवा. 520 शैलेंद्र पाटील,पो.हवा. 217 राज बच्छाव,हे रेल्वे सुरक्षाबल नाशिकरोड येथील मनिशकुमार सिंह, के.के. यादव ,सागर वर्मा,यांचे सोबत गस्त करीत असतांना त्यांना ६ वा. दरम्यान रेकाॅर्डवरील आरोपीत फैसल अजिज खान रा. रमाबाई नगर मनमाड ता.नांदगाव जि.नाशिक हा रेल्वे स्टेशन नाशिकरोड येथील मेन गेट जवळील हनुमान मंदीराजवळ दिसून आल्याने त्याचे जवळ जावुन त्याची झडती घेतली असती त्याचे कडे एक विवो कं.चा गोल्डन रंगाचा मोबाईल व दुसरा ओपो कं.चा निळया रंगाचा मोबाईल असे दोन मोबाईल मिळुन आल्याने त्यास सदर मोबाईल बाबत विचारपुस केली असता उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यास पोलीस ठाण्यात आणुन हजर केले. आरोपी कडे मिळुन आलेले मोबाईल बाबत रेल्वे पोलीस ठाण्यातील गुन्हे पडताळणी केली असता गु.र.नं. 179/2025 कलम 303(2) बी.एन.एस.मध्ये व गु.र.नं. 178/2025 कलम 305(सी) बी.एन.एस. मध्ये मोबाईल चोरीस गेलेले निष्पन्न झाले रेकाॅर्डवरील आरोपी फैजल अजिज खान,याचे कडे अधिक विचारपुस केली असता सदरचे मोबाईल हे चोरी केल्याचे कबुल केले आहे.करीता सदर गुन्ह्यांमध्ये आरोपीस अटक करण्यात आली असुन दोन गुन्हे उघड करण्यात आले आहे.सदरची ही कामगिरी स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग मनमाड, वसंत भोये, यांचे मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस ठाणे नाशिकरोड येथील प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन बनकर, सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील ,पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील,राज बच्छाव,योगेश पाटील, बेबीनंदा गायकवाड,व रेल्वे सुरक्षाबल नाशिकरोड येथील निरीक्षक नवीन प्रताप सिंह, आरक्षक मनिश कुमार, के.के. यादव, सागर वर्मा यांनी केली आहे.
Comments
Post a Comment