अभोणा येथील गणेश मंडळाने साकारला संत गोरोबाकाका यांचा जिवंत देखावा
अभोणा :- एमआयबी एकलव्य गणेश मित्र एकलव्य गणेश मंडळ शास्त्रीनगर अभोणा तालुका कळवण जिल्हा नाशिक यांच्या वतीने आगळावेगळा असा जिवंत देखावा थोर पांडुरंग भक्त संत गोरोबाकाका यांचा साकारण्यात आला आहे.देखावा बघण्यासाठी परिसरातील गणेश भक्त मोठया संख्येने उपस्थित लावत आहेत.मंडळाचे अध्यक्ष किशोर पाटील दिलीप चव्हाण, हिम्मत पवार,शंकर पवार, राजेंद्र तायडे,आकाश कुमावत,महेश चव्हाण,अनिल घोडेस्वार, विजय चव्हाण,आदींसह पदाधिकारी यांनी सदरच्या देखाव्याची संकल्पना अस्तित्वात आणली आहे.समाज प्रबोधन तसेच वारकरी संप्रदायाच्या थोर संतांचा इतिहास सर्वांना ज्ञात व्हावा असा उद्देश गणेश मंडळाचा आहे. दरवर्षी नव नवीन समाजप्रबोधन पर देखावे मंडळाच्या वतीने साकारण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment