मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयास वाढीव ३० जागांची मान्यता कार्यकारिणीच्या पाठपुराव्यास यश

मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयास वाढीव ३० जागांची मान्यता कार्यकारिणीच्या पाठपुराव्यास यश, २०२५-२६ शैक्षणीक वर्षापासून होणार विद्यार्थ्यांना लाभ
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संचलीत डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयास वाढीव ३० जागांची परवानगी मिळाल्याने आता एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमाची क्षमता १२० वरून वाढ होऊन १५० झाली आहे.जागावाढीसाठी मविप्र कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय प्रशासन ऑक्टोबर २०२४ पासून शासन दरबारी पाठपुरावा करीत होते. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास अर्ज करण्यात आला होता. या जागा वाढीसाठी नॅशनल मेडीकल कमिशन (दिल्ली), महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (मुंबई) आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक) या तीनही संस्थांच्या कठीण अशा मूल्यांकन आणि क्रमवारी निश्चिती प्रक्रिया यशस्वी रित्या पूर्ण कराव्या लागतात. मविप्रने या संस्थांची प्रत्येकी एक मूल्यांकन तपासणी यशस्वी रित्या पूर्ण केली असून महाविद्यालयास जागा वाढीचे परवानगी पत्र प्राप्त झाले आहे.शैक्षणीक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पार पडली आहे, दुसऱ्या फेरीच्या आधीच वाढीव जागा मान्यता प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत आणि गुणवत्ताधारक प्रवेशइच्छुक, गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा निश्चित फायदा होईल. अशी माहिती महाविद्यालयाचे डीन डॉ. सुधीर भामरे यांनी दिली.या संधीबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ सयाजीराव गायकवाड, डॉ प्रसाद सोनवणे, अॅड. संदीप गुळवे, अॅड.लक्ष्मण लांडगे, प्रवीण जाधव, विजय पगार, रमेश पिंगळे, अमित बोरसे, अॅड. रमेशचंद्र बच्छाव व इतर संचालकांनी महाविद्यालय प्रशासन व शिक्षणाधीकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. स्वर्गीय डॉ. वसंतराव पवारांच्या दूरदृष्टी आणि प्रयत्नांतून १९९० साली साकार झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्षमतेत ३० जागांची वाढ करून आणली ही आमच्या साठी अभिमानाची गोष्ट आहे. या वर्षी आम्ही वैद्यकीय क्षेत्रातील ०७ विषयांच्या पी. एच. डी. साठीही जागा मंजूर करून आणल्या आणि एम. एस, एम. डी च्या जागा वाढाव्या यासाठी आम्ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. या आणि मविप्रच्या इतर सर्वच शाखांची गुणवत्ता टिकावी आणि वाढावी असा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आलेलो आहोत. भविष्यातही अशाच दर्जेदार संस्था आम्ही सभासद व समाजासाठी तयार करू. मविप्र मधील चांगल्या संधीचा आणि गुणवत्तेचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा. - अॅड. नितीन ठाकरे,सरचिटणीस, मविप्र.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन