खा.भास्कर भगरे यांच्या हस्ते कुंभार समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव
नाशिक :- नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यास खा.भास्कर भगरे यांची उपस्थिती समाजाच्या वतीने मान्यवरांचा गौरव समारंभ,विद्यार्थी गुणगौरव,सेवा निवृत्त कर्मचारी सत्कार सोहळा संपन्न.यावेळी दिंडोरी लोकसभा खासदार भास्कर भगरे,यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी समाजाचे प्रदेशाध्यक्ष रमाकांत क्षीरसागर,जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे,रमेश गायकवाड,शाम जोंधळे,अशोक जाधव,राजेंद्र रोकडे, गणेश आहेर,नंदू सोनवणे,विट उत्पादक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय चव्हाण, (अभोणा) मान्यवर उपस्थित होते.मेळाव्याचे आयोजन नाशिक जिल्हा कुंभार समाज जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे,यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली करण्यात आले.याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील मान्यवर सत्कारमूर्ती,महिलांसह कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा