बागलाण तालुक्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आ.दिलीप बोरसे यांना निवेदन
बागलाण :- तालुक्यातील आरोग्य विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मतदारसंघाचे आ.दिलीप बोरसे, यांना मागण्यांचे निवेदन दिले.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे नियमित शासन समायोजन करणे बाबत मुख्य मागणी करण्यात आली आहे. होत असलेल्या विलंबाबाबत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी १९/०८/२०२५ आंदोलन करत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्टात आरोग्य सेवा मोठया प्रमाणात प्रभावीत झालेली आहे.शासनाने लवकरात लवकर आंदोलनाची दखल घ्यावी याबाबत आ.दिलीप बोरसे यांना निवेदन देवुन शासन दरबारी न्याय मिळवून देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी आमदार बोरसे यांच्याकडे केली आहे.याबाबत आरोग्य मंत्री आबिटकर,यांची भेट घेऊन कंत्राटी कर्मचारी यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी दिले.याप्रसंगी कत्रांटी कर्मचारी किरण भामरे,मोराणकर साहेब, राहुल पवार,देवा हिरे,आरोग्य सेविका क्षमा शिरशैट्टी, वैशाली शिरोळे,रत्ना देवरे,रुपाली वाघ,निर्मला सोनजे, भारती शिंदे,पुनम पवार, सोनाली वाघ,मनाली हिरे,सिमा गावीत,माधुरी आहेर,धनश्री नवरे,भाग्यश्री गाडेकर,आदि कंत्राटी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment