कुंभार समाज समितीच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थिती सुशिलाबाई बोरसे यांचा सन्मान
नाशिक दि.५:- जिल्हा कुंभार समाज विकास समितीतर्फे विद्यार्थी गुणगौरव,संतभूषण,आदर्श माता-पिता पुरस्कार सत्कार सोहळा प्रसंगी संत सेवा पुरस्काराने दिंडोरी येथील प्रगतशील शेतकरी वीट उत्पादक वै.गणपतराव बोरसे,यांच्या पत्नी बहादुरी येथील कै.नामदेव वैद्य,यांच्या कन्या गं.भा.सुशीलाताई गणपत बोरसे,यांचा सन्मान समितीच्या वतीने रमाकांत शिरसागर,महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झीरवाळ, भारती पवार,मा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री,सोमनाथ सोनवणे जिल्हा अध्यक्ष,यांच्या उपस्थितीत संत सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सुशिलाताई यांचे अभिनंदन संत गोरोबा काका कुंभार समाज, हभप अंबादास गारे,अशोक महाराज,चेतन महाराज,माणिक रसाळ,खैरनार साहेब,ज्ञानेश्वर भागवत, नाशिक जिल्हा वीट उत्पादक आघाडी अध्यक्ष विजय चव्हाण अभोणा,युवा जिल्हाध्यक्ष निलेश राऊत नाशिक,सुमन बोरसे,छाया बोरसे,रंभाताई बोरसे, वैशाली चव्हाण, तसेच सर्व भजनी मंडळ, सर्व महिला मंडळ ,सर्व युवक मंडळ, सरपंच व ग्रामस्थ दिंडोरी यां सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment