चणकापुर आश्रमशाळेतील विद्यार्थाच्या दुर्दैवी मृत्यूने पालकवर्गात संताप


कळवण :- आदिवासी आश्रमशाळेमध्ये निष्काळजी पणाचा कळस!; तिसरीच्या वर्गातील रोहीत बागुल, दुर्दैवाने मृत्यूमुखी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाच्या टेबलावर पाच तास पडून होता रोहितचा मृतदेह कळवण आदिवासी प्रकल्पातील आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक,शारिरीक विकासाऐवजी आता मृत्यूचे घर ठरली आहे.चणकापूर शासकीय आश्रमशाळेत घडलेला प्रकार धक्कादायक असाच आहे. तिसरी इयत्तेत शिकणारा निष्पाप विद्यार्थी रोहित विलास बागुल,याचा निष्काकाळजी,कारभारामुळे मृत्यू झाला आहे.अधिक धक्कादायक बाब म्हणजे,रोहितचा मृतदेह तासनतास आश्रमशाळेत मुख्याध्यापकांच्या  टेबलावर पडून होता. जबाबदार अधिकारीवर्ग मात्र कर्तव्यावर नव्हते.रोहितची प्रकृती गेल्या दोन,तीन दिवसांपासून बिघडली होती. त्याची तब्येत गंभीर झाली.शाळेतील अधीक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्याकडे जबाबदारी असतांना योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळाले नाही.अधीक्षक संजय नांदणे,हा रजा टाकून गायब होता,मुख्याध्यापक बालाजी भुजबळ, कर्तव्यावर उपस्थित नव्हता.विद्यार्थ्याच्या जीवाशी असा उघडपणे खेळ मांडण्यात आला.सकाळच्या सुमारास शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर रोहितचा मृतदेह मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवण्यात आला.तासनतास  मृतदेह पडून होता हि माहिती पालकवर्गाला, तसेच परिसरात पसरल्याने.शोककळा पसरली आहे. याघटनेची माहिती मिळताच आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा,व प्रकल्प अधिकारी अंकुनुरी नरेश,तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.प्राथमिक चौकशीत मुख्याध्यापक बालाजी भुजबळ,अधीक्षक संजय नांदणे,यांनी या प्रकरणात बेजबाबदारपणा केल्याचे समोर आल्याने.दोघांना निलंबित करण्यात आले आहे.रोहितच्या मृत्यूने पालकवर्गाने संताप व्यक्त केला आहे.याप्रसंगी शेकडो पालकांनी शाळेसमोर जमून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा यावेळी देण्यात आला, यावेळी कळवण डिवाय एसपी किरण कुमार सुर्यवंशी, यांनी याप्रकरणी सखोलपणे चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे यावेळी प्रसिद्धी प्रमुख न्यूज प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन