नवीमुंबई येथील हरवलेली मुलगी रेल्वे पोलीसांच्या मदतीने आई वडिलांच्या ताब्यात
ना.रोड :- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) मुंबई येथुन अपनयन झालेल्या मुलीचा लोहमार्ग पोलीसांनी शोध घेवुन पोलीस आई वडीलांचे ताब्यात दिले.याबाबत गोपीनाथ आनंद बाईत,रा.ऐरोली,नवी मुंबई यांची मुलगी कस्तुरी वय 16 वर्ष ही दि. २७/०९/२०२५ रोजी सकाळी ६.३० वा.सुमारास तिच्या मैत्रीणीकडे जाते असे सांगुन गेली व परत न आल्याने तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन अपहरण केले.म्हणुन रबाळे पोलीस ठाणे नवी मुंबई येथे तक्रार दिल्याने गु.र.नं.७१३/२०२५ कलम १३७(२) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.सदर अपनयन झालेली मुलगी ही रेल्वे स्टेशन नाशिकरोड येथे असल्याबाबत रबाळे पोलीस ठाणे नवी मुंबई यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे नाशिकरोड येथे कळविले होते. लोहमार्ग पोलीस स्टेशन नाशिक रोड येथील सहाय्यक फौजदार 69 संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील व पो.हवा. 217 राज बच्छाव यांनी हद्दीत शोध घेता कस्तुरी वय 16 वर्ष ही वेटींग रूम मध्ये बसलेली दिसुन आली.तिला ताब्यात घेवुन रेल्वे पोलीस ठाणे ना.रोड आणुन हजर करत रबाळे पोलीस ठाणे तिच्या आईवडील यांना फोनद्वारे माहिती दिली. रबाळे पोलीस ठाणे महिला पोलीस हवालदार ब.नं 1401 सपकाळ व कस्तुरी चे आई वडील हे लोहमार्ग रेल्वे पोलीस नाशिक रोड ठाण्यात आल्यावर अपनयन झालेली मुलगी कस्तुरी ही त्यांचे ताब्यात देण्यात आली.सदरची कामगिरी स्वाती भोर उपअधिक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये,यांचे मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस ठाणे नाशिकरोड येथील प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन बनकर, सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील , पोलीस हवालदार 217 राज बच्छाव,यांनी केली.
Comments
Post a Comment