वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त दि.२९ सोमवारी रोजी सभासद पाल्यांचा सत्कार समारंभ
मविप्र सेवक सहकारी सोसायटीला ४ कोटी ८७ लाखांचा विक्रमी नफा
नाशिक :- जिल्हयातील पगारदार पतसंस्थांमध्ये अग्रगण्य असलेल्या नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटीला आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तब्बल ४ कोटी ८७ लाख ३६ हजार ६५९ रुपये इतका विक्रमी नफा झाला असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष संजय नागरे,यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सोमवार दि.२९ रोजी सकाळी १० वाजता कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह,गंगापूर रोड, नाशिक येथे सेवानिवृत्त सभासद व गुणवंत सभासद पाल्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.सोसायटीची आजमितीस सभासदसंख्या ३,८४३ इतकी असून,भागभांडवल ६० कोटी अठठावन्न लाख नव्यान्नव हजार नऊशे बावीस इतके आहे. कर्ज मर्यादा ५० लाखांपर्यंत आहे. कार्यकारी मंडळाने ६.२५ टक्के लाभांशांची शिफारस केली आहे. कर्ज व ठेवीवरील व्याजदर समान म्हणजे ७ टक्के असणारी पगारदार पतसंस्थांमधील एकमेव पतसंस्था आहे. सभासदांचा मृत्यू झाल्यास २५ लाखापर्यन्त कर्ज माफी दिली जाते. सेवक सोसायटीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाइन सर्व्हर घेतले आहे. सभासदाला आपल्या वैयक्तिक खात्याची अद्यावत माहिती मिळण्यासाठी मोबाइल अॅपची सुविधा करण्यात आली आहे.
सोसायटीने सभासदांसाठी सभासद कल्याण निधी योजना, सभासद सहाय निधी व सभासद परिवार सदभावना योजना तर सेवानिवृत्त सभासदांचा तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार मानचिन्ह देऊन केला जातो. सोसायटीच्या सभासदाचा आकस्मित मृत्यू झाल्यास त्यांचे संपूर्ण येणे कर्ज कल्याण निधीतून माफ केले जाते. तसेच बिगर कर्जदाराचा आकस्मित मृत्यू झाल्यास सभासद सहाय निधीतून त्यांच्या परिवाराला रुपये १ लाख आर्थिक मदत दिली जाते. सभासदाचा आकस्मित मृत्यू झाल्यास सभासद परिवार सदभावना योजनेतून रुपये २ लाख मदत दिली जाते. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या पार्श्वभूमीवर सहकार व शिक्षण क्षेत्राचा समन्वय साधत पगारदार पतसंस्थामध्ये मविप्र सेवक सोसायटीने आपल्या स्वतःच कामकाजाचा आदर्श मापदंड उभा केला आहे.सदर कार्यक्रमासाठी मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम मोगल व चिटणीस दिलीप दळवी तसेच संचालक मंडळ व सर्व शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत,असे सोसायटीचे अध्यक्ष संजय नागरे, उपाध्यक्ष नंदकुमार घोटेकर,मानद चिटणीस विनित पवार, सुनिल आहेर, सुनिल काळे, मंगेश ठाकरे, किरण उघडे, ज्ञानेश्वर जाधव, डॉ. संजय शिंदे, मनिष बोरसे, कृष्णराव मोरे, अनिल भंडारे, शांताराम चांदोरे दत्तराज हयाळीज, बळीराम जाधव, वैशाली कोकाटे, सुवर्णा कोकाटे,आदींनी कळविले आहे.३८ लाखांची कर्जमाफी, ११ लाखांची मदत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात सभासद कल्याण निधीमधून ७ मयत सभासदांचे रुपये ३७ लाख ८७ हजार ६७७ इतके कर्ज माफ करण्यात आले आहे. तसेच सभासद सहाय निधीतून मयत झालेल्या ३ बिगर कर्जदांना रुपये २ लाख ७५ हजार आर्थिक मदत देण्यात आली आहे, तसेच ४ आकस्मित मृत्यू झालेल्या सभासदांच्या परिवारास सभासद परिवार सदभावना योजनेतून रुपये ८ लाख मदत देण्यात आली आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment