खिराड आश्रमशाळेतील अन्न पाणी पुरवठा तपासण्यात यावा विद्यार्थीनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल
अभोणा :- दि.१०/०९/२०२५ खिराड आश्रम शाळेतील इयत्ता अकरावी शिकणाऱ्या मुलीला दहा दिवसापासून ताप येत असुनही आश्रमशाळेतील अधिक्षक मुख्याध्यापक, यांनी योग्य काळजी न घेतल्याने पालकवर्ग संतापले फक्त तापाच्या गोळ्या देण्याचे काम. वैद्यकीय उपचारासाठी लवकर दवाखान्यात दाखल केले गेले नसल्याने हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे.याप्रकरणी उशीरा दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी नऊ वाजता अभोना येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.खिराड आश्रम शाळेतील मुख्याध्यापक अधीक्षक यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी आश्रम शाळेत किती मुली आजारी आहेत याबाबत चौकशी करून सदर मुलींना अभोणा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करावे तसेच पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासावेत व अन्नपुरवठा योग्य आहे का याबाबत लक्ष घालावे तसेच कळवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी आश्रम शाळेतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत ते पिण्यासाठी योग्य आहे का तसेच सदर सर्व आश्रम शाळेला आहार पुरवणाऱ्या संस्था आश्रम शाळेत जेवणाचा आहार योग्य शिजवून देतात का याबाबत चौकशी करावी दोषी आढळल्यास कारवाई करावी अशी मागणी,अण्णासाहेब हजारे भ्रष्टाचार विरोधी विरोधी जन आंदोलन कळवण तालुका व व्यसनमुक्ती संघटना कळवण तालुका दत्तात्रय मोरे,विजय चव्हाण,विजय जाधव, दत्तू पाटील, अनिल ठाकरे,मुलीचे वडील वसंत ठाकरे, यांच्या वतीने करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment