गुन्हे शाखा युनिट एकच्या वतीने फरार गुन्हेगाराला अटक
नाशिक :- शहरात प्राण घातक शस्त्र घेऊन फिरणारे दहशत माजवून दंगली घडवून गुन्हे करणारे गुन्हयातील पाहिजे असलेले इसमावर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,नाशिक शहर यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे त्या अनुषंगाने किरणकुमार चव्हाण,पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके,सहा पोलीस आयुक्त गुन्हेशाखा,यांनी गुन्हेशाखेचे पथक तयार करून मार्गदर्शन केले.व दि.२४/०१/२०२४ रोजी दाखल गु.रजि.नं २९/२०२४ गुन्ह्यांत विविध कलमा अंतर्गत हवा असलेला आरोपीत अरफात पठाण,याचा शोध घेण्यासाठी आदेश देण्यात आले होते.त्याबाबत गोपनीय बातमीदाराकडून पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे,पोलीस अंमलदार मुक्तार शेख,यांना माहिती मिळाली की गुन्ह्यांत हवा असलेला अराफत पठाण,हा शिवाजी चौक कथडा जुने नाशिक या भागात फिरत आहे.ती माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड,यांना दिली असता त्यांनी पथकातील गुन्हे शाखा युनिट एकचे पो उपनिरीक्षक सुदाम सांगळे,पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे,प्रशांत मरकड,विशाल काठे,नजीमखान पठाण,विशाल देवरे,मिलिंदसिंग परदेशी, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार मुक्तार शेख,चालक पोलीस हवालदार सुखराम पवार, कारवाई करण्यास सांगितले.त्याप्रमाणे सापळा रचून शिवाजी चौक खुशी मल्टीपर स्टोअर दुकानासमोरुन दि.२०/०९/२०२५ रोजी ताब्यात घेतले आहे.भद्रकाली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment