गुल्हाटी परिवाराच्या वतीने प्रबोधन पर श्री गणेशाचा देखावा
इंदिरानगर :- गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्र. क्र. 23 मध्ये विनयनगर पुर्ती सोसायटी येथे गुल्हाटी परिवाराच्या वतीने एक अति सुंदर असा सामाजिक देखावा साकारण्यात आला आहे. त्यात गोर गरीब मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रबोधन केलेले आहे.आजच्या काळात मुलांना शिक्षणाची नितांत गरज आहे परंतु परिस्थितीमुळे काही मुले शिकू शकत नाहीत. त्या मुला मुलींसाठी गुल्हाटी कुटुंबीयांनी शिक्षणाची गरज या विषयावर सुंदर असा देखावा साकारलेला आहे.देखावा बघण्यासाठी परिसरातील येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ते वही व पेन्सिल घेत आहेत.हे जमा झालेल सर्व शैक्षणिक साहित्य गोर गरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी गणपती विसर्जन झाल्या नंतर देणात येणार आहे.प्रभागातील गरीब वस्तीतील गरजू शाळेतील मुलांना ते साहित्य वाटप करण्यात येणार आहे.जेणे करून गरीब मुलांची शिक्षणाची इच्छा पूर्ण होईल हा देखावा विना गुलाटी,सचिन गुल्हाटी,रीमा गुल्हाटी,रणवीर गुल्हाटी, यांनी साकारला आहे.प्रभाग क्रमांक २३ च्या माजी नगरसेविका रुपालीताई निकुळे,माजी नगरसेवक यशवंत निकुळे, यांनी गुल्हाटी कुटुंबांने साकारलेल्या देखाव्याचे सामाजिक कार्याचे भेट देत कौतुक केले.
Comments
Post a Comment