मखमलाबाद विद्यालयात मविप्र माध्यमिक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
फोटो - मखमलाबाद विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक रमेश आबा पिंगळे, व शालेय समितीचे अध्यक्ष, सदस्य माजी नगरसेविका चित्राताई तांदळे, प्राचार्य संजय डेर्ले, उपप्राचार्य राजेंद्र गाडे शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंद व विद्यार्थी मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे केंद्र स्तरीय माध्यमिक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संचालक रमेश पिंगळे यांच्या शुभहस्ते पार पडले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अभिनव बाल विकास मंदिर स्कूल कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती मामा महाले, होरायझन स्कूल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे, मराठा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे ,विश्वनाथ पिंगळे, दिलीपराव पिंगळे, आबासाहेब मुरकुटे, चंद्रभान पिंगळे, उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे शिवाजी पिंग...