बापु बंगला परिसरात श्री राम मंगल अक्षता कलशाचे विधीवत पूजन नागरिकांनी घेतला दर्शनाचा लाभ
इंदिरानगर :- येथे श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून अभिमंत्रित करून आलेल्या निमंत्रणाच्या अक्षता कलशांचे स्वागत व पुजन बापू बंगला येथील मा. नगरसेविका सुप्रिया खोडे याच्या जनसंपर्क कार्यालय येथे नवदाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी येथे दि. २२ जानेवारी रोजी होत आहे. यासाठी घरोघर संपुर्ण भारतात निमंत्रण दिले जात आहे.अयोध्या येथून अभिमंत्रित करून आलेल्या निमंत्रणाच्या अक्षता कलशांचे आगमन झाले तेव्हा नवदाम्पत्य नवरदेव दिशांत पाटील व नवरी यामिनी सोनावणे (राहणार बापू बंगला) व माजी नगरसेवक सुनील खोडे व सुप्रिया खोडे याच्या हस्ते व राम भक्तांच्या उपस्थितीत जय श्रीराम जय श्री राम गजरात अक्षता कलशांचे पूजन करण्यात आले.उपस्थिताना निमत्रन अक्षदाचे वाटप करण्यात आले.यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment