जि.प. शाळा धोंगडेवाडी कृष्णनगर 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न
इगतपुरी :- आज रोजी 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद शाळा धोंगडेवाडी कृष्णनगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवर, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रेखा संतोष धोंगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत उपसरपंच गणेश धोंगडे, यांनी श्रीफळ फोडून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक विजय जाधव सर सहकारी शिक्षक रेवगडे सर यांनी सूत्रसंचालन करीत कार्यक्रमाची शोभा वाढवली. शालेय मुलंमुलींनी देशभक्तीवर आधारित भाषणे, मान्यवरांची भाषणे करीत देशभक्तीमय वातावरण केले. शाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुलांनी सहभाग घेत नाटके, भाषणे, उखाणे, देशभक्ती पर गीत गायन, विविध देशभक्तीवर आधारित डान्स करून मान्यवरांची मने जिंकली.
75 वा प्रजासत्ताक दिनाच औचित्य साधत परिसरातील शिक्षणप्रेमींनी शाळेस मुलामुलींसाठी क्रीडा साहित्य पुरवण्यात आले शिक्षणप्रेमी कार्यसम्राट सभापती तसेच विद्यमान सरपंच सोमनाथ जोशी, धनाजी राव,संतोष भाऊ धोंगडे,मल्हारी धोंगडे, वाळू पारवे,रामदास धोंगडे, ग्रामसेवक भगवान गणेशकर,
गावचे ग्रामस्थ वाळू पारवे यांनी मुलांना अल्पोहर देत विविध स्पर्धेत यश मिळवलेले विद्यार्थी यांना बक्षिस वितरण करण्यात आले कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment