मखमलाबाद विद्यालयात बालिका दिन उत्साहात साजरा

फोटो - बालिका दिन साजरा करताना प्राचार्य संजय डेर्ले , उपप्राचार्य राजेंद्र गाडे,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी

मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय डेर्ले ,उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्येष्ठ शिक्षक बाबाजी मुरकुटे, अनिल पगार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानिमित्ताने पाचवी फ च्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर नाटिका सादर केली. तसेच समीक्षा दिघे या या विद्यार्थिनीने मी सावित्री बोलते आहे ...ही एकांकिका सादर केली. पाचवी फ व सहावी अ च्या विद्यार्थ्यांनी साक्षरता गीत सादर केले. विद्यालयाचे प्राचार्य संजय डेर्ले यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याची माहिती देताना त्यांनी आपल्या मनोगतात असे म्हटले की सावित्रीबाई फुले या जर नसत्या तर आजही स्त्रिया ह्या अशिक्षित राहिल्या असत्या व देशाची प्रगती झाली नसती. आज स्त्री शिक्षणाचं फलित म्हणून एक महिला देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजे राष्ट्रपतीपदावर विराजमान आहे हे सावित्रीबाई फुले यांच्या मुळे शक्य झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा प्रकारे त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला . प्राचार्य संजय डेर्ले यांनी साक्षरता गीतास शंभर रुपयाचे बक्षीस दिले .सूत्रसंचालन गौरी शिंदे या विद्यार्थिनींने केले. विद्यार्थ्यांस वैशाली देवरे व संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय डेर्ले उपप्राचार्य राजेंद्र गाडे व सर्व शिक्षक- शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन