मखमलाबाद विद्यालयात मविप्र माध्यमिक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
फोटो - मखमलाबाद विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक रमेश आबा पिंगळे, व शालेय समितीचे अध्यक्ष, सदस्य माजी नगरसेविका चित्राताई तांदळे, प्राचार्य संजय डेर्ले, उपप्राचार्य राजेंद्र गाडे शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंद व विद्यार्थी
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे केंद्र स्तरीय माध्यमिक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संचालक रमेश पिंगळे यांच्या शुभहस्ते पार पडले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अभिनव बाल विकास मंदिर स्कूल कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती मामा महाले, होरायझन स्कूल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे, मराठा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे ,विश्वनाथ पिंगळे, दिलीपराव पिंगळे, आबासाहेब मुरकुटे, चंद्रभान पिंगळे, उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे शिवाजी पिंगळे, राजेंद्र ढबले, बाळासाहेब पिंगळे, दत्तात्रय पिंगळे, गोकुळ पिंगळे, माजी नगरसेविका चित्राताई तांदळे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे, अभिनवचे मुख्याध्यापक सी बी पवार उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केले होते. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व त्यातून त्यांचा विकास होतो असं प्रतिपादन संस्थेचे संचालक रमेश पिंगळे यांनी केले. दुपारी संस्थेचे संचालक रमेश पिंगळे व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे समूह गीत जनता विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज सातपूर यांचा (प्रथम), होरायझन अकॅडमी अकॅडमी गंगापूर रोड आयसीएससी (द्वितीय ) होरायझन अकॅडमी सीबीएससी,( तृतीय क्रमांक) जनता विद्यालय मातोरी (उत्तेजनार्थ) श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद यांनी क्रमांक मिळविला. (उत्तेजनार्थ) वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत के बी एच हायस्कूल गिरणारे (प्रथम) जनता विद्यालय सातपूर (द्वितीय) क्रमांक होरायझन अकॅडमी आयसीएससी (तृतीय) - छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद (उत्तेजनार्थ) होरायझन अकॅडमी सीबीएससी (उत्तेजनार्थ) वैयक्तिक वाद्य वादन के बी एच हायस्कूल गिरणारे (प्रथम) श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद (द्वितीय) जनता विद्यालय मातोरी (तृतीय) माध्यमिक विद्यालय शेवगे दारणा (उत्तेजनार्थ) होरायझन अकॅडमी सीबीएससी गंगापूर रोड,(उत्तेजनार्थ) सामूहिक नृत्य प्रकारात श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मखमलाबाद (प्रथम) जनता विद्यालय सातपूर (द्वितीय) के बी एच हायस्कूल गिरणारे (तृतीय) होरायझन अकॅडमी आयसीएससी गंगापूर रोड (उत्तेजनार्थ) जनता विद्यालय मातोरी (उत्तेजनार्थ) वरील प्रमाणे बक्षीस समारंभ पार पडला.प्राध्यापिका करंजकर मॅडम व लभडे मॅडम केटीएचएम कॉलेज यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी संस्थेचे संचालक रमेश आबा पिंगळे व गावातील जेष्ठ नागरिक ,सभासद विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय डेर्ले, उप प्राचार्य राजेंद्र गाडे होते. शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार ,वैशाली देवरे ,प्रमिला शिंदे यांनी केले व आभार उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांनी मानले.
Comments
Post a Comment