मखमलाबाद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नवनीत चित्रकला स्पर्धेत सुयश
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथील विद्यार्थ्यांनी नवनीत चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत शाळेतील एकूण ५५१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी १५ विद्यार्थ्यांना या स्पर्धेत बक्षीसे प्राप्त झाली.बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना नवनीततर्फे मोठी रंगपेटीचे बाॅक्स गिफ्ट म्हणुन देण्यात आले.
तसेच कलाशिक्षकांना बॅग गिफ्ट देण्यात आली.इयत्ता पाचवी ते सहावीच्या गटातील बक्षीस पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे.कु.ऋषिकेश बहिरम,कु.समृद्धी सोनवणे, कु.अनुष्का खांदवे,कु.सोहम हांडे.कु.देवयानी खंबाईत,कु. समीक्षा जाधव,कु.सलोनी डंबाळे, कु.सादाफ शेख,कु.मेघा पवार, तसेच इयत्ता सातवी ते दहावीच्या गटातील बक्षीस पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे कु.राणी पागी,कु. आस्मी भुरकुड,कु.चंदना वाघेरे, कु.संकेत सोनवणे,कु.पलक दिघे, कु.समृद्धी ढगे.या सर्व बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना प्राचार्य संजय डेर्ले, उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांच्या शुभहस्ते रंगपेटीचे बॉक्स प्रदान करण्यात आले.यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे व सुधीर तांबे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment