भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर उपाध्यक्षा पदी अनिता भामरे यांची नियुक्ती
नाशिक :- भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या उपाध्यक्षा पदी अनिता महेश भामरे यांची निवड नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केली. सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत शहराध्यक्ष जाधव यांनी अनिता भामरेंना नियुक्तीपत्र दिले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिकला पार पडलेल्या राज्य अधिवेशनात अणिता भामरेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. अनिता भामरे यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजप मध्ये दाखल झाल्या, त्यांची शहर उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने नाशिक महानगर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment