डुप्लीकेट पास बाळगून सिटीलिंक मधून प्रवास करणार्या प्रवाश्यांवर होणार दंडात्मक कारवाई
नाशिक :- नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने नियमित प्रवास करणार्या प्रवाश्यांकरिता सवलतीच्या दरात विविध प्रकारच्या पासेसचे वितरण करण्यात येते. सद्यस्थितीत नियमित प्रवास करणार्या प्रवाश्यांकरीता सिटीलिंकच्या वतीने पुढील पासेसचे वितरण करण्यात येते. –
१) विद्यार्थी पास
२) विशिष्ट मार्ग पास
३) ओपेन एंडेड पास
४) दिव्यांग मोफत पास
सिटीलिंकच्या स्थापनेपासून सदर पास हे साध्या पद्धतीचे देण्यात येत होते परंतु नेहमीच प्रवाश्यांना अद्ययावत सेवा देता याव्यात यासाठी सिटीलिंक नेहमीच प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून सिटीलिंक ने साध्या पास ऐवजी आता प्रवाश्यांना RFID पास देण्यास सुरुवात केली आहे. तसेच दिनांक ०१ जानेवारी २०२४ पासून सदर RFID पास हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. RFID म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. नवीन RFID पास मध्ये ईलेक्ट्रोनिक चीप असल्याकारणाने सदर प्रवाश्याची सिटीलिंक संदर्भात तसेच ज्या बसमधून प्रवाशी प्रवास करीत आहे त्या बसमध्ये पास स्कॅन झाल्याने सदर वाहकाने बस फेरी दरम्यान केलेल्या कामकाजाची इत्यंभूत माहिती मिळते. त्यामुळे कोणतेही आर्थिक अपहार टाळण्याच्या दृष्टीने RFID कार्ड महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
परंतु सद्यस्थितीत असे निदर्शनास येत आहे की, काही प्रवासी डुप्लीकेट RFID पास बनवून प्रवास करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु डुप्लीकेट पास मध्ये विशिष्ट ईलेक्ट्रोनिक चीप नसल्याकारणाने असे पास स्कॅन होत नाही. परंतु अश्याप्रकारे डुप्लीकेट पास बाळगून प्रवास करणारे प्रवासी आढळून आल्यास सदर प्रवासी विनाटिकीत प्रवासी समजून अश्या प्रवाश्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी. प्रवाश्यांनी विनाटिकीट दंडात्मक कारवाई टाळण्याकरिता सिटीलिंककडून प्राप्त अधिकृत RFID कार्डच जवळ बाळगणे आवश्यक आहे.
दिनांक ०१ जानेवारी २०२४ पासून RFID पास अनिवार्य करण्यात आल्याने दिव्यांग प्रवासी तसेच अन्य सवलतीच्या पासचा लाभ घेणार्या प्रवाश्यांनी सिटीलिंकच्या अधिकृत पास केंद्रावरून RFID कार्ड काढून घ्यावे. अन्यथा प्रवाश्यांना सवलतीच्या पासचा लाभ घेता येणार नाही. व डुप्लीकेट पास बाळगलयास विनाटिकीत प्रवासी समजून दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी.
Comments
Post a Comment