अयोध्येतील श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापना निमित्त भोई गल्ली परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम
नाशिक:-भोई समाज मित्र मंडळ सावरकर चौक येथे समस्त भोई समाज मित्र मंडळाच्या वतीने आयोध्या येथील बहुप्रतिक्षित श्री राम मंदिरातील श्री राम मुर्ती प्रतिष्ठापना निमित्त मोठ्या प्रमाणावर आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी आकर्षक सजावटीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री राम भक्तांनी परिसर भगवामय करत सजवला महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.प्रंसगी नितीन ठाकरे,विकास ठाकरे,बाळू भोई,पिन्टू ठाकरे,आमोल गुणवंत,सोनू ठाकरे,देवानंद ठाकरे,अक्षय काथवटे, गणेश आहिरे,राजु वाडेकर,भारत डांगरे,भरत ब्राह्मणे, निखिल सासे, सोमनाथ घटमाळे,रवि ठाकरे,पवन घटमाळे, आदींसह परिसरातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment