मखमलाबाद विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन "हुतात्मा दिन" म्हणुन मोठ्या उत्साहात साजरा
फोटो - हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधीजींच्या प्रतिमापुजन प्रसंगी स्कुल कमिटी सदस्य साहेबराव पिंगळे,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,जेष्ठ शिक्षकवृंद व सहभागी विद्यार्थी
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन "हुतात्मा दिन" म्हणुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.स्कुल कमिटी सदस्य साहेबराव पिंगळे,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर जेष्ठ शिक्षक अनिल पगार,नितीन जाधव,सुनिता उशीर,अर्चना दिघे,अभिजीत न्याहारकर उपस्थित होते.कु.ईश्वरी नेटावटे हिने महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन ३० जानेवारीला झाले.त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भारतामध्ये दरवर्षी ३० जानेवारीला "हुतात्मा दिन" साजरा केला जातो.महात्मा गांधी यांनी सत्य,अहिंसा आणि शांतता या त्रिसुत्रीचा त्यांनी अवलंब केला.इंग्लंडमध्ये वकिलीची सनद घेऊन मोहनदास करमचंद गांधी हे भारतामध्ये आले.त्यांनी देशासाठी अनेक वेळा सत्याग्रह केले.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले सर्व आयुष्यपणाला लावले.सुत्रसंचलन कु.श्रध्दा खोटरे हिने केले.इ.६ वी ई च्या या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक अभिजीत न्याहारकर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment