शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि. २४: शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थान, विधानभवन, रिगल सिनेमा चौकातील बाळासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा, बाळासाहेब भवन याठिकाणी विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री  शिंदे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर विधानभवनातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार मनीषा कायंदे,अमोल मिटकरी आदी उपस्थित होते.

मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुखांना जयंती दिनी अभिवादन केले. त्यानंतर कुलाबा येथील रिगल सिनेमा चौकातील बाळासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन