मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यादरम्यान जखमी विलास गाढे यांची भुजबळांनी घेतली भेट
नाशिक :- येवला दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताच्या वेळी झालेल्या अपघातात जखमी झालेल्या विलास गाढे यांच्यावर नाशिकमधील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना समवेत रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या विलास गाढे यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या कुटुंबियांशी देखील संवाद साधला, तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही सविस्तर चर्चा केली.
Comments
Post a Comment