जनता विद्यालयात युवादिन साजरा



नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. १३/१/२०२४ रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. याकार्यक्रमाचे आयोजन इयत्ता १० वी ब च्या वर्गात करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली.यावेळी प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी पिंगळे यांनी केले. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका के.एस.आगळे होत्या. जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त तृप्ती राजगुरू यांनी गीत सादर केले. तसेच जयेश चौघुले , आर्यन जाधव यांनी पोवाडा सादर केला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने नयन गाडेकर ह्याने भाषण केले. १० वी क.चा पीयुष मुर्तडक ह्याने स्वतः स्केच केलेले चित्र मुख्याध्यापिका व सर्व शिक्षिकांना भेट स्वरूपात दिले. विद्यालयात नवनिर्वाचित शिक्षकांचे स्वागत मुख्याध्यापिकांतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का सुग्रामकर हिने केले व आभार प्रदर्शन एकता ताजणे हिने केले.


Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन