उपशिक्षक सुमित बाळासाहेब भामरे उपक्रमशिल पुरस्काराने सन्मानित
निफाड :- तालुक्यातील कोठरे येथे मराठा विद्या प्रसारक मंडळ प्रणित स्वांतत्र्यवीर सावरकर विद्यालयात उपशिक्षक म्हणुन कार्यरत असलेले सुमित भामरे यांना उपक्रमशील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सुमित भामरे हे मुळ बागलाण तालुक्यातील धांद्री या गावाचे भूमिपुत्र असुन त्याना कोठुरे येथील संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी सन्मानीत करण्यात आले मुख्याध्यापक कदम मॅडम शालेय व्यवस्थापन समितीचे तुषार भाऊ मोगल सुयोग गिते विजय पवळे, रोशन दवते, शिवाजी सानप,संजय निकम, सुधाकर निकम,संस्थेचे सर्व शिक्षकवर्ग विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांच्यासह उपस्थितीत हा सोहळा पार पडला सुमित भामरे सर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment