दिवाळी निमित्त दिव्यांगांना नाशिक प्रहार दिव्यांग संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किराणा किट वाटप
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- दिपावली सणोत्सवा निमित्त बाजारात उत्साहाचे वातावरण असताना समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या दिव्यांगांना ही दिवाळी साजरी करता यावी यासाठी माजी राज्यमंत्री ना. बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने शहरातील गरजु दिव्यांगांना किराणा वाटप करण्यात आले,प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनिल भडांगे, यांनी दिवाळी निमित्त पुढाकार घेऊन दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले,या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनिल भडांगे, जिल्हा कार्याध्यक्ष बबलु मिर्झा,उपजिल्हाध्यक्ष रूपेश परदेशी,प्रमोद केदारे,सुदाम श्रीसुंदर, ज्योत्स्ना सोनार,आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment