मराठा उद्योजक सेवा संस्थेचा उपक्रम - ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते या धनादेशांचे वाटप

मविप्र महाविद्यालयांतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
नाशिक मविप्रच्या कर्मवीर बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी आणि राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन या दोन महाविद्यालयांतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशांचे वाटप करताना मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे. समवेत मराठा उद्योजक सेवा संस्थेचे पदाधिकारी व दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य

नाशिक :- आर्थिक स्तर अतिशय कमी असलेल्या होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून किंबहुना त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल अधिक सुकर व्हावी, या उदात्त हेतूने मराठा उद्योजक सेवा संस्थेने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी आणि राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन या दोन महाविद्यालयांतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप केले.मराठा उद्योजक सेवा संस्था दरवर्षी समाजातील गरजू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन आणि योग्य ते निकष लावून विद्यार्थ्यांची निवड करत असते. आणि अशा विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस भरीव अशी आर्थिक मदत केली जाते.या संस्थेने याही वर्षी म्हणजेच 2025 -26 या शैक्षणिक वर्षात मविप्र समाज संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधील पाच विद्यार्थ्यांची निवड केली.यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पियुष पाटील यास रुपये 25 हजाराचा धनादेश, तर राजश्री शाहू महाराज तंत्रनिकेतनमधील द्वितीय व तृतीय वर्षातील हर्षल विजय पाटील, वैष्णव भगवान खोकले, यश बापू अहिरे, हितेश विश्वास आहिरे या विद्यार्थ्यांची निकषानुसार निवड करून त्यांनाही प्रत्येकी १५ हजार रुपये धनादेशाच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली.
मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते या धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी मविप्र संचालक ॲड. लक्ष्मणराव लांडगे, आर. के. बच्छाव, मराठा उद्योजक सेवा संस्थेचे अध्यक्ष महेंद्र बच्छाव, सभासद संजय ठाकरे, राजेश मुळाणे, दीपक चव्हाण, विकास बच्छाव, हंसराज देशमुख, कमलेश उशीर, सागर बोंडे, विजय पाटील, नितीन गायकवाड, प्राचार्य डॉ. सतीश देवणे, प्राचार्य प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन